Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

सूर्यमाला

आपल्या सूर्यमालेत (Solar System मध्ये) ९ मुख्य ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथवी, मंगळ, गुरू, शनि, हर्षल/युरेनस, नेप्च्युन आणि माझा आवडता प्लूटो. बुध (Mercury) सूर्याच्या जरा जास्तीच जवळ आहे म्हणुन भयानक गरम आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ असल्यामुळे त्याच्या वर tidal locking झाले आहे. म्हणजे त्याची एकच बाजु सूर्याकडे तोंड करुन असते. दुसरी बाजु सूर्यापासुन नेहेमी लांब असल्यामुळे तिथे भयानक थंडी असते. शुक्र (Venus) पृथवी च्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. पण त्याला पर्यावरतन (atmosphere) नसल्यामुळे तो बुधापेक्षा जास्ती गरम असतो. त्याच्या जमिनीवर पाठवलेले सर्व यान काही तास चालुन बंद पडले आहेत. पृथ्वी (Earth) वर आपण रहातो. आतापर्यंत पृथवीला सोडुन दुसऱ्या कुठल्याच ग्रहावर जीवन सापडलेलं नाही. पृथ्वीला एक चंद्र आहे ज्याचं नाव सोम आहे. मंगळ (Mars) लाल आहे. अमेरिकेने बरेच यान पाठवले आहेत. आपण सुद्धा मंगळयान पाठवलं आहे. मंगळाकडे दोन चंद्र आहेत: फोबॉस आणि डीमॉस. गुरू (Jupiter) आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण बळ जबरदस्त ताकदीचे असल्यामुळे त्याला ६७ चंद्र आहेत. त्यातले ४ सगळ्य...