Skip to main content

सूर्यमाला

आपल्या सूर्यमालेत (Solar System मध्ये) ९ मुख्य ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथवी, मंगळ, गुरू, शनि, हर्षल/युरेनस, नेप्च्युन आणि माझा आवडता प्लूटो.

बुध (Mercury) सूर्याच्या जरा जास्तीच जवळ आहे म्हणुन भयानक गरम आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ असल्यामुळे त्याच्या वर tidal locking झाले आहे. म्हणजे त्याची एकच बाजु सूर्याकडे तोंड करुन असते. दुसरी बाजु सूर्यापासुन नेहेमी लांब असल्यामुळे तिथे भयानक थंडी असते.

शुक्र (Venus) पृथवी च्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. पण त्याला पर्यावरतन (atmosphere) नसल्यामुळे तो बुधापेक्षा जास्ती गरम असतो. त्याच्या जमिनीवर पाठवलेले सर्व यान काही तास चालुन बंद पडले आहेत.

पृथ्वी (Earth) वर आपण रहातो. आतापर्यंत पृथवीला सोडुन दुसऱ्या कुठल्याच ग्रहावर जीवन सापडलेलं नाही. पृथ्वीला एक चंद्र आहे ज्याचं नाव सोम आहे.

मंगळ (Mars) लाल आहे. अमेरिकेने बरेच यान पाठवले आहेत. आपण सुद्धा मंगळयान पाठवलं आहे. मंगळाकडे दोन चंद्र आहेत: फोबॉस आणि डीमॉस.

गुरू (Jupiter) आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण बळ जबरदस्त ताकदीचे असल्यामुळे त्याला ६७ चंद्र आहेत. त्यातले ४ सगळ्यात मोठे चंद्र म्हणजेच गॅनिमीड, कॅलिस्टो, युरोपा आणि आयओ. गुरू वेगवेळ्या प्रकारच्या वायुने बनलेला आहे म्हणुन कदाचित त्याच्यावर उभं रहायला ही जागा नसेल.

शनि (Saturn) गुरूपेक्षा जरा लहान आहे पण त्याच्या भोवतालच्या कड्यांसकट बघितला तर मोठा वाटतो. त्याला किमान ६२ चंद्र आहेत. शनिच्या सर्वात मोठ्या चंद्राचं नाव टायटन आहे.

हर्षल किंवा युरेनस (Uranus) टेलिस्कोपाचा उपयोग करुन शोधलेला पहिला ग्रह आहे. हा निळ्या रंगाचा आहे आणि बघितल्यावर असं वाटतं की पोटावर फिरतोय. सूर्याची एक चक्कर मारायला त्याला ८४ वर्षं लागतात. त्याला २७ चंद्र आहेत.

नेप्च्युन (Neptune) चा ग्रह ही निळा आहे आणि त्याचे गुरुत्वाकर्षण बळ इतके शक्तिशाली आहे की तो प्लूटो आणि कायपर बेल्ट मधल्या गोष्टींना हलवु शकतो. त्याला १४ चंद्र आहेत.

प्लूटो (Pluto) कायपर बेल्ट मधला पहिला ग्रह आहे. NASA चं न्यु होरायझन्स (New Horizons) यान २०१५ मध्ये प्लूटोच्या जवळुन गेलं होतं. प्लूटो ला ५ चंद्र आहेत आणि सर्वात मोठ्या चंद्राचं नाव शॅराॅन आहे.

इतर:-
1. सिरीस (Ceres): नविन व्याख्यामुळे confusion वाढवत सिरीझ ला कधी कधी लघुग्रह आणि कधी कधी बटु ग्रह म्हणतात. सिरिझ मंगळ आणि गुरू च्या मधल्या लघुग्रहांच्या पट्ट्यात (asteroid belt मध्ये) आहे.
2. एरिस (Eris): प्लूटोच्या पुढे कायपर बेल्ट मध्ये एरिस आहे. त्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा जास्त असल्यामुळे दिसताना तो प्लूटोपेक्षा मोठा दिसतो पण खरंतर एरिस आकाराने प्लूटोपेक्षा जरासा लहान आहे.
3. माकेमाके (Makemake): सूर्याची एक परिक्रमा करायला ह्याला ३०९ वर्षं लागतात. एक चंद्र आहे.

महत्वाच्या छोट्या वस्तु:
१. ऑर्कस (Orcus): सूर्याभोवती एक परिक्रमा करायला जवळ जवळ २४८ वर्षं लागतात. एक चंद्र आहे.
२. ग्रह क्रमांक 2002 MS4 ला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला २६९ वर्षं लागतात.
३. सॅलेशिया (Salacia): सूर्याभोवती एक परिक्रमा करायला २७० वर्षं लागतात. एक चंद्र आहे.
४. क्वावार (Quaoar): सूर्याभोवती एक परिक्रमा करायला २८५ वर्षं लागतात. एक चंद्र आहे.
५. ग्रह क्रमांक 2007 OR10 ला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला ५४८ वर्षं लागतात. एक चंद्र आहे.
६. सेडना (Sedna): सूर्याभोवती एक परिक्रमा करायला ११,४०० वर्षं लागु शकतील.

Note/टीपा:
ह्या list मधल्या दोन ग्रहांना नावं दिलेली नाहीत. त्यांना ओळखण्यासाठी नंबर दिलेला असतो. त्याच नंबरांनी त्यांना सध्या ओळखलं जातं.

सिरीझ, प्लूटो, एरिस आणि माकेमाके ह्या चार ग्रहांना IAU (International Astronomical Union) ने बटु ग्रहाचा दर्जा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

बुध

Mercury म्हणजे बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला ८८ दिवस लागतात. रोमन लोकांच्या देवदुतावरुन त्याला नाव मरक्युरी पडलं आहे. मराठीत आप...