Skip to main content

बुध

Mercury म्हणजे बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला ८८ दिवस लागतात. रोमन लोकांच्या देवदुतावरुन त्याला नाव मरक्युरी पडलं आहे. मराठीत आपण त्याला बुध म्हणतो. बुध हा चंद्र आणि गुरूच्या पत्नी तारा चा ‎अनौरस मुलगा आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असल्यामुळे बुध आणि शुक्र हे ग्रह आपल्याला सूर्योदय होताना किंवा सूर्यास्त होताना दिसुन येतात. सूर्याभोवती परिक्रमा करायची त्याची पद्धत आगळी वेगळी असल्यामुळे बुधावर एका दिवसात दोन वर्षे पुर्ण होतात.

अमेरिकेने ह्या ग्रहावर दोन याने पाठवली आहेत. मरिनर १० 1974 आणि 1975 साली बुधाच्या बाजुने उडाले होते. MESSENGER (मेसेंजर) 2004 साली पाठवले होते. ४ वर्षे बुधाची परिक्रमा केल्यानंतर त्याचे इंधन समाप्त झाले आणि 30 एप्रिल 2015 रोजी ते बुधावर आपटवुन नश्ट करण्यात आले.

आपल्या सूर्यमालेतील चार terrestrial planets पैकी एक बुध आहे. ह्याचा अर्थ असा की त्या ग्रहावर उभे रहायला जमिन आहे. गुरूचा एक उपग्रह (चंद्र) गॅनिमीड आणि शनिचा उपग्रह टायटन बुधापेक्षा आकाराने मोठे आहेत.

बुधावर १०० k ते 700 k एवढे तापमान असते. इतक्या गरमीतसुद्धा असे दिसुन आले आहे की बुधावर पाण्याचा बर्फ आहे. तो इतका लहान आणि गरम असल्यामुळे त्याला atmosphere नाही.

सूर्यमालेतील सर्व वस्तु एका बाजुला वाकलेले असतात. ह्याचं कारण लाखो वर्षांपुर्वी आपटलेले धुमकेतु किंवा इतर ग्रह म्हटलं जातं. बुध ही ०.०२७ degree वाकडा आहे. बुधावर काही ठिकाणी उभे राहुन पाहिले तर सूर्योदय झाल्यावर लगेच तो खाली जाऊन पुन्हा उगवताना दिसतो. बुधाच्या वाकड्यापणामुळे असे होते. पृथ्वीवरुन कधीकधी सर्व ग्रह असे उलट्या दिशेने चालताना दिसतात. ह्याच उलटेपणाला ज्योतिषात "वक्री" असे म्हटले गेले आहे.

पुरातन काळी असिरीया, बॅबिलॉन, रोम, ग्रिस, चीन, अरेबिया, आणि भारतातील लोकांना बुधाबद्दल माहिती होती. बुध सूर्यापासुन ०.३० आणि ०.४६ AU च्या अंतरात असतो. पृथ्वीच्या सूर्यापासुनच्या सरासर अंतराला १ Astronomical Unit (AU) म्हणतात. बुधाचा diameter 4,879.4 km आहे आणि तो सूर्याभोवती 47.362 किलोमिटर प्रति सेकंदाच्या सरासर गतीने फिरतो.

Comments

Popular posts from this blog

सूर्यमाला

आपल्या सूर्यमालेत (Solar System मध्ये) ९ मुख्य ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथवी, मंगळ, गुरू, शनि, हर्षल/युरेनस, नेप्च्युन आणि माझा आवडता प्लूटो. बुध (Mercury) सूर्याच्या जरा जास्तीच जवळ आहे म्हणुन भयानक गरम आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ असल्यामुळे त्याच्या वर tidal locking झाले आहे. म्हणजे त्याची एकच बाजु सूर्याकडे तोंड करुन असते. दुसरी बाजु सूर्यापासुन नेहेमी लांब असल्यामुळे तिथे भयानक थंडी असते. शुक्र (Venus) पृथवी च्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. पण त्याला पर्यावरतन (atmosphere) नसल्यामुळे तो बुधापेक्षा जास्ती गरम असतो. त्याच्या जमिनीवर पाठवलेले सर्व यान काही तास चालुन बंद पडले आहेत. पृथ्वी (Earth) वर आपण रहातो. आतापर्यंत पृथवीला सोडुन दुसऱ्या कुठल्याच ग्रहावर जीवन सापडलेलं नाही. पृथ्वीला एक चंद्र आहे ज्याचं नाव सोम आहे. मंगळ (Mars) लाल आहे. अमेरिकेने बरेच यान पाठवले आहेत. आपण सुद्धा मंगळयान पाठवलं आहे. मंगळाकडे दोन चंद्र आहेत: फोबॉस आणि डीमॉस. गुरू (Jupiter) आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण बळ जबरदस्त ताकदीचे असल्यामुळे त्याला ६७ चंद्र आहेत. त्यातले ४ सगळ्य...